
रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रा करत आहेत. आज त्यांच्या या पदयात्रेचा चौथा दिवस आहे. या संघर्ष यात्रेत रोहित पवार यांच्यासोबत रोहित आर.आर पाटील देखील सहभागी झाले आहेत.

शिरूर तालुक्यातील उरळगाव फाट्यापासून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी रोहित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

निर्वी गावात युवा संघर्ष यात्रा पोहोचली. तेव्हा रोहित पवार यांनी स्थानिक तरूणांशी संवाद साधला. आयर्न मॅन सतीश पठारे यांच्याशीही रोहित पवार यांनी चर्चा केली.

रोहित पवार हे न्हावरे गावात पोहोचले तेव्हा 92 वर्षांच्या आजी या पदयात्रेत सहभागी झाल्या. आई-बहिणींचा आशीर्वाद... या आजींचा सहभाग आम्हाला बळ देणारा आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.

या पदयात्रेदरम्यान रोहित पवार यांनी एका चिमकल्यासोबत सेल्फी काढला. पाठिंबा देण्यासाठी आलेल्या या चिमुकल्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.