मनसे तालुकाध्यक्षाच्या पत्नीने उधळला विजयाचा गुलाल, राज ठाकरेंना काठी न् घोंगडी भेट

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी विजयी झाल्या. त्यानिमित्त सौ. रेश्मा सुरेश टेळे यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 3:54 PM
1 / 6
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

2 / 6
मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी काही जणांचे सत्कार करण्यात आले.

3 / 6
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी विजयी झाल्या. त्यानिमित्त सौ. रेश्मा सुरेश टेळे यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी विजयी झाल्या. त्यानिमित्त सौ. रेश्मा सुरेश टेळे यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

4 / 6
सत्कारानंतर टेळे दाम्पत्याने घोंगडी आणि काठी देऊन राज ठाकरे यांच्याविषयी आदर व्यक्त केला. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष अप्पा करचे, आकाश होणमाणे, पप्पू तरंगे, नदीम मुलानी इत्यादी उपस्थित होते.

5 / 6
महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे कार्यकर्त्यांना स्वतःच्या हिमतीवर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. एप्रिलमध्ये निवडणुका गृहित धरुन कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या.

6 / 6
राज ठाकरेंनी काठी आणि घोंगडीसह पोझ दिल्यावर कार्यकर्त्यांनीही लाडक्या राजसाहेबांचा एकामागून एक फोटो क्लिक केले