
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रा करत आहेत. आज या यात्रेचा सहावा दिवस आहे.

पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांचं ठिकाठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे.

मोठमोठे हार घालत तसंच फुलांची उधळण करत पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जात आहे. यावेळी मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

या यात्रेदरम्यान मिळणाऱ्या प्रेमामुळे पंकजा मुंडे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या भागाने लोकनेते मुंडे साहेबांइतकंच माझेवरही प्रेम केलं आहे. ही जनतेची सेवा आणि शक्ती वाढविण्याकडे समर्पित भावनेनं काम करण्याची शक्ती दे, हीच ईश्वराकडे प्रार्थना करते, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

आज सकाळी धाराशीव-कळंब विधानसभा निवडणूक प्रमुख दत्ता कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी पंकजा यांना ही प्रतिमा भेट देण्यात आली.