नऊवारी साडी, मराठमोळा साज अन् नार गुलजार; प्राजक्ता माळी म्हणतेय, ‘काही लिहायची गरज?’

जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठमोळ्या अंदाजात पोहोचली. तिचे हे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्राजक्ताच्या कॅप्शननेही सर्वांचं लक्ष वेधलंय.

| Updated on: May 19, 2026 | 1:45 PM
1 / 5
कान्स फिल्म फेस्टिव्हल हा जगातील सर्वांत जुन्या, सर्वांत मोठ्या आणि सर्वांत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी मे महिन्यात फ्रान्समधील कान्स इथं हा महोत्सव भव्यदिव्य पद्धतीने आयोजित केला जातो. या सोहळ्यात जगभरातील चित्रपटांचे प्रीमियर होतात.

कान्स फिल्म फेस्टिव्हल हा जगातील सर्वांत जुन्या, सर्वांत मोठ्या आणि सर्वांत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी मे महिन्यात फ्रान्समधील कान्स इथं हा महोत्सव भव्यदिव्य पद्धतीने आयोजित केला जातो. या सोहळ्यात जगभरातील चित्रपटांचे प्रीमियर होतात.

2 / 5

दरवर्षी या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड सेलिब्रिटींचे लूक्स कसे आहेत, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. परंतु यावर्षी बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांनी आपली मराठी संस्कृती आणि मराठमोळा साज सातासमुद्रापार पोहोचवला आहे.

3 / 5

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'कान्स'मधील हा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या लूकमधील काही सुंदर फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 'काही लिहायची गरज? फक्त मिळत असलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल..खूप प्रेम,' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

4 / 5

प्राजक्ताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'सौंदर्यालाही लाजवेल असं सौंदर्य' अशी प्रतिक्रिया एकाने लिहिली आहे. तर 'महाराष्ट्राची अप्सरा' असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'जणू काही इंद्राघरची अप्सरा उभी सागराकाठी,' अशा ओळी एका नेटकऱ्याने प्राजक्तासाठी लिहिल्या आहेत.

5 / 5

मोरपिसी रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर मराठमोळा साज, नथ, चंद्रकोर, कमरपट्टा असा परिपूर्ण प्राजक्ताचा लूक आहे. कान्सच्या समुद्रकिनारी तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे. मराठमोळं सौंदर्य सातासमुद्रापार गाजत आहे, अशाही प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us