
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांसाठी तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे प्राजक्ता सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या मुलाखतीमध्ये तिने लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. आता प्राजक्ता नेमकं काय म्हणाली? चला जाणून घेऊया...

प्राजक्ता माळी ही लोअर मिडल क्लास कुटुंबात लहानची मोठी झाली आहे. तिचे वडील हे पोलीस खात्यात हवालदार होते. त्यांची पोस्टिंग स्वारगेट येथे झाली होती. स्वारगेट येथील पोलीस कॉटर्स येथे राहत होती. जन्मपासून ते वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत प्राजक्ता तेथे राहात होती. नंतर ती वाकड पोलीस लाइनमध्ये राहायला गेली. याबाबत स्वत: प्राजक्ताने माहिती दिली आहे.

प्राजक्ता या मुलाखतीमध्ये म्हणाली की, "वाकडनंतर सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये राहयला होतो आणि मग आम्ही आताच्या घरी शिफ्ट झालो. माझे आजोबाही पोलीस खात्यात होते. वडील पोलीस खात्यात होते. लहानपणी सगळं हाता तोंडाशी होतं. माझे आजोबा त्यांच्या लहानपणी सोलापूरहून पुण्यात शिफ्ट झाले होते. त्यामुळे त्यांनीही त्यांचे बस्तान त्याकाळी बसवले होते. वडिलांनीही त्यावर हळूहळू मनोरे रचले आणि आता आम्ही त्यावर अंलकृत करण्याचे काम करत आहोत. वडिलांना सुरुवातीच्या काळात भरपूर स्ट्रगल करावा लागला. कारण त्यांच्यावर त्यांची पाच भावंडे अवलंबून होती. त्यावेळी ते एकटे कमावते होते."

प्राजक्ता माळी ही शाळा-कॉलेजात असताना अतिशय शांत होती. तिला लाजाळू, अगदी छोट्या सर्कलमध्ये चालणारी होती. एकदा तर प्राजक्ताने आईचा मार खाल्ला होता. तोही सतत हातात पुस्तक घेत असल्यामुळे. आईला मैत्रिणीकडे असं प्राजक्ताला सांगावे लागत असे. प्राजक्ता सतत अभ्यास करत असे आणि पुस्तक वाचत असे. त्यामुळे तिच्या आईला तिला खेळायला जा असे सांगावे लागत असे.

लहानपणीचा एक किस्सा सांगताना प्राजक्ता म्हणाली, "मी तीन वर्षांची असताना एका रात्री घरातीला कोणालाच सापडत नव्हते. सगळे मला शोधत होते. जवळपास साडेतीन तास हे नाट्य सुरू होतंे आणि मी खाटेखाली सापडले. साडेतीन तास काहीही आवाज न करता मी भातुकलीचा खेळ खेळत होते. मी इतकी शांत होते की कोणाला कळलंच नाही मी कुठे आहे ते."