
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिकच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने पत्नी धनश्री वर्मसोबत घटस्फोट घेतलाय. युजवेंद्र हा आरजे महवशला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.

धनश्री वर्मा ही देखील कोरियोग्राफर प्रतिक उतेकर याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाली. ज्यानंतर दोघे डेट करत असल्याची चर्चा आहे.

आता यावर प्रतिक उतेकर याने थेट सोशल मीडिया पोस्टच शेअर केलीये. प्रतिक उतेकरने इंस्टा स्टोरीवर लिहिले की, दुनिया इतकी मोकळी आहे की, कथा बनवणे, कमेंट करणे आणि काही पण बघते. फक्त एक फोटो डीएम करण्यासाठी...समजूतदार बना मित्रांनो असे त्याने म्हटले आहे.

या पोस्टच्या माध्यमातून तो बरेच काही सांगून जाताना दिसतोय. मागील काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, युजवेंद्रसोबतच्या घटस्फोटानंतर धनश्री प्रतिकला डेट करतंय.

मध्यंतरी तर चर्चा सुरू होत्या की, प्रतिकमुळेच धनश्रीने युजवेंद्रला सोडले आहे. प्रतिक उतेकर याच्यासोबत सतत नाव जोडले असताना धनश्री वर्मा हिने माैन बाळगले आहे.