Tukaram Mundhe: प्रिती झिंटाही तुकाराम मुंढेंची ‘फॅन’; थेट टी-शर्टवरच छापला असा मजकूर
Tukaram Mundhe: अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने जो टी-शर्ट परिधान केला आहे, त्यावरील मजकुराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या तिच्या एका व्हिडीओमध्ये तिने घातलेल्या काळ्या रंगाच्या टी-शर्टवर ‘टीम तुकाराम मुंढे’ असं लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, तुकाराम मुंढे यांच्याबद्दलचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये प्रिती झिंटा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी जीन्स आणि स्पोर्ट्स शूज असा साधा पण स्टायलिश लूक केला आहे. मात्र तिच्या टी-शर्टवरील मजकुराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘टीम तुकाराम मुंढे’ असं टी-शर्टवर लिहिलेलं दिसत आहे.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीच्या आणि कामातील स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात. प्रशासकीय सेवेत काम करताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनातील त्यांच्या कामामुळेही त्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तसंच सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय ठरत आहेत. विविध सेलिब्रिटींकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. आता प्रिती झिंटानेही हा टी-शर्ट परिधान करून त्यांना जाहीर पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
याआधी सलमान खान, ट्विंकल खन्ना यांसारख्या सेलिब्रिटींनीही तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीचं कौतुक केलं होतं. आता प्रिती झिंटाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.