Priya Berde: माझ्या हाताला अक्षरश: चटके बसले… प्रिया बेर्डेंनी सांगितला अनुभव
Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये व्यवसाय करत असतानाचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी त्य़ावेळी त्यांचे हात भाजले असल्याचे म्हटले आहे. आता नेमकं काय घडलं होतं?

मराठमोळ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे या कायमच चर्चेत असतात. त्या अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतात. पण नुकताच त्यांनी एका मुलाखतीमध्ये पुण्यात व्यवसाय करत असतानाचा अनुभव सांगितला आहे.
प्रिया बेर्डे यांनी राजश्री मराठीच्या एका पॉडकास्टमध्ये पुण्यात हॉटेल चालवत असतानाचा अनुभव सांगितला आहे. त्या म्हणाल्या की पुण्यात हॉटेल असताना मी रोटी बनवायला शिकले होते. त्याने अक्षरश: ती एक पिंपासारखी भट्टी बनवली होती.
पुढे त्या म्हणाल्या की, त्या पिंपाला आतून माती वैगरे लावली होती. त्याच्या आत ती रोटी टाकावी लागते. वाकून रोटी आत टाकावी लागते. मी दोन ते तीन वेळा प्रयत्न केले होते. हाताला जाम चटके वैगरे लागले होते. ते आपलं कामच नाही.
हॉटेलचा तो जो बिझनेस आहे ना तिथे पुरुषांची मक्तेदारी जारा जास्त आहे. बायकांची फार नाही. या सगळ्या गोष्टी खायला हव्या म्हणून आपण घरगुतीपद्धतीचं मी योग्य पद्धतीने सांभाळलं आहे असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, आपल्याकडे एक पद्धत असते ना घरात आपण हॉटेलसारखं जेवण करण्याचा प्रयत्न करत असतो. ते आपल्याला हवं असते. आणि बाहेर गेलो की आपल्याला घरगुती पद्धतीचं जेवण हवं असतं. काही वेगळाच विरोधाभास आहे.