चहाच्या टपरीमागे नेऊन अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार; पुण्यात भयंकर घडलं!

पुण्यातील दौंड येथे धक्कादायक घटना घडली आहे. प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला आहे.

| Updated on: Jun 30, 2025 | 6:34 PM
1 / 5
पुण्याच्या दौंडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पुण्याच्या दौंडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5

दौंडच्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली हद्दीत पुण्याहून सोलापूरचे दिशेने जाणारे खाजगी वाहन चहा पिण्यासाठी एका चहाच्या टपरीवर थांबले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5

त्यावेळेस एका वाहनावर दोन युवक आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5

या अल्पवयीन मुलीला दोन अज्ञात इसमांनी एका टपरीच्या पाठीमागे नेऊन अत्याचार केला.दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5

यावेळी घटनास्थळी दौंड पोलीस दाखल झाले. त्यानंतर दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us