40 विद्यार्थ्यांनी भरलेली बस, थेट विहिरीजवळ जाऊन…पुण्यात स्कुल बससोबत भयंकर घडलं!
असे असतानाच आता पुण्यात स्कूल बससोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या बसमध्ये एकूण 40 विद्याथी होते. विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस विहिरीच्या कठड्यावर अडकली आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. प्रवासी बसलेले पिकअप थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

असे असतानाच आता पुण्यात स्कूल बससोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या बसमध्ये एकूण 40 विद्याथी होते. विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस विहिरीच्या कठड्यावर अडकली आहे.

ही बस विहिरीत पडली असती तर होत्याचं नव्हतं झालं असतं. मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. पुण्यातील हडपसर-सासवड रोडवरील वडकी परिसरात ही घटना घडली आहे.

बस विहिरीत कोसळण्यापूर्वीच अडकल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अशा घटना घडू नयेत यासाठी वाहनचालकांनी काळजी घेऊन वाहने चालवावीत, असे आवाहन केले जात आहे.