
राज्यभरातून नव्हे तर देशभरातील पर्यटक लोणावळा आणि खंडाळा येथे येतात. लोणावळ्यातील विविध स्थळांना भेट देत निसर्गाचा आनंद लुटतात. पावसाळ्यात लोणावळ्यातील निसर्ग अधिकच खुललेले असते. यामुळे याकाळात पर्यटकांची गर्दी असते.

गेल्या तीन, चार दिवसांपासून राज्यात पाऊस सुरु झाला आहे. लोणावळ्यात मुसळधार पाऊस नसला तरी अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहे. यामुळे पुणे, मुंबईतील पर्यटक वर्षाविहारसाठी शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात दाखल होतात. यामुळे पर्यटकांची गर्दी होत असते.

लोणावळ्यात सध्या धुके पडले आहे. यामुळे लोणावळ्यातील वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्याचा आनंद पर्यटक घेत असताना लोणावळ्यातून जाणारे वाहनचालकही घेत आहेत. स्वत:च्या वाहनाने जाणारे अनेक वाहनधारक काही वेळ थांबवून फोटो काढून घेत आहेत.

लोणावळ्याला लाभलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्ग, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरदऱ्या पर्यटकांना नेहमी खुणावत असतात. पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे पाहिल्यावर पर्यटकांना खूपखूप सुखद येतो. आता संपूर्ण लोणावळ्यात धुक्याची चादर पसरली आहे.

लोणावळा आणि खंडाळ्यात व्यवसाय पर्यटानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पावसाळ्यातील चार महिने लोणावळ्यात पर्यटकांची चांगलीच गर्दी असते. यामुळे लोणावळ्यातील नागरिकांना रोजगारही मोठ्या प्रमाणावर मिळतो तसेच व्यावसायिकांचा व्यवसाय वाढलेला असतो.