
मुलांनी आयुष्यात कधी कोणत्या गोष्टी कराव्या याचे मार्गदर्शन कायमच पालक करत असतात. अनेकदा पालक बजावून सांगतात की आयुष्यात चांगल्या गोष्टी करायला हव्यात. कधीच कोणते पालक आपल्या मुलाला वाईट गोष्टींचे मार्गदर्शन करत नाही. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेल्या खुलास्याने सर्वजण चकीत झाले आहेत. त्याने वडिलांनी सांगितलेल्या चार नियमांचा खुलासा केला आहे.

आम्ही ज्या मराठमोळ्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो दुसरातिसरा कोणी नसून पुष्कर क्षोत्री आहे. त्याने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याच्या वडिलांचे चार नियम सांगितले आहेत. हे नियम दारू प्यायला जाताना लक्षात ठेव असे देखील ते म्हणाले होते. क्वचितच असे पालक असतील जे मुलांना दारू पिण्याचे नियम सांगत असतील.

पालकांनी मुलांना आणि मुलींना त्याच्या योग्य वयात योग्य गोष्टी समाजावून सांगणे गरजेचे असते. याविषयी बोलताना पुष्करने त्याच्या वडिलांबद्दल सांगितले की, "माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, एकटा दारू प्यायला जायचं नाही. दुसरी गोष्ट दारू पिताना तू काय खातोस हे महत्त्वाचं आहे. उगाच अरबट चरबट खाऊन शरीराची हानी करून घेऊ नको, हेल्दी खा."

पुढे वडिलांच्या नियाविषयी बोलताना पुष्कर म्हणाला की, "तिसरी गोष्ट तू ज्यांच्यासोबत प्यायला जातोयस ते तुझे मित्र आहेत ना हे आधी कन्फर्म करून घे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू पिताना चर्चेला घ्यायचे विषय, पॉलिटिक्स घेऊ नये, क्रिकेट घेऊ नये हे विषय दारू पिताना घ्यायचे नाहीत. ज्याच्यामुळे वाद होतील असे विषय घ्यायचे नाहीत. हेच तर आहे ना. दारू पिताना घेण्यासारखे खूप विषय आहेत. पॉलिटिक्स हा दारू पिताना घ्यायचे. क्रिकेट, इंडिया पाकिस्तान, का दारू पिताना चर्चेला घ्यायला पाहिजे. भांडणं होतात."

"असतात कोणी राइट, लेफ्ट विंगचे... ते जर एकत्र एका टेबलवर आले तर काय होईल. आता पॉलिटिशियन्स त्यांचे इतके विषय आपल्याला चर्चेला देत आहेत ते आपण घेऊ शकतो. आपले ते काम आहे का, त्यासाठी त्यांची टीम आहे, तुला आणि मला काय गरज आहे. तुमच्या विचारांना कोणी महत्त्व देणार आहे का? मग कशासाठी असे विषय चर्चेला घ्यायचे" असे पुष्कर म्हणाला.