Raid 2 OTT Release: अजय देवगण-रितेश देशमुखचा ‘रेड 2’ ओटीटीवर कधी अन् कुठे?

'रेड 2' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. रितेशने यामध्ये भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारली आहे.

| Updated on: May 01, 2025 | 3:41 PM
1 / 5
अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रेड 2' आज 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीची माहिती समोर आली आहे.

2 / 5
'ई टाइम्स'च्या रिपोर्टनुसार 'रेड 2'ने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत डिजिटल रिलीजची डील केली आहे. थिएटरमध्ये अपेक्षित कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांना ऑनलाइन पाहता येईल. त्यामुळे ओटीटीवर हा चित्रपट जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला येऊ शकतो.

3 / 5
एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सर्वसाधारणपणे 60 दिवसांचा अवधी दिला जातो. त्यानंतर तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जातो.

4 / 5
'रेड 2'मध्ये अजय देवगणने अमय पटनायक या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर रितेश देशमुख हा भ्रष्ट राजकारणाच्या भूमिकेत आहे. यामध्ये वाणी कपूर ही अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. राज कुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

5 / 5
'रेड 2' या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग चांगली झाली आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये या चित्रपटाची कमाई चांगली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.