Share Market: मार्चपासून आतापर्यंत 50 रिटर्न…बुलेट ट्रेनसारखा हा शेअर सुसाट

Stock Market: भारतीय शेअर बाजार सतत हिंदोळ्यावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून पडझडीचे सत्र सुरू आहे. असे असेल तरी या रेल्वेच्या शेअरने मोठी झेप घेतली आहे. या स्टॉकमध्ये 50 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

| Updated on: May 16, 2026 | 5:19 PM
1 / 6
Texmaco Rail and Engineering च्या शेअरने बाजारात कमाल केली आहे. मार्च महिन्यापासून या शेअरमध्ये आतापर्यंत 50 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. असे असेल तरी या पाच महिन्यात हा स्टॉक आतापर्यंत 15 टक्क्यांनी झोपला आहे. एका वर्षाचा विचार करता रेल्वे कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 25 टक्क्यांची घसरण झाली आहे.

2 / 6
या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,  वार्षिक आधारावर मार्च तिमाही दरम्यान एकूण लाभ 45.10 टक्के वाढला आहे. मार्च तिमाही दरम्यान रेल्वे स्टॉकला एकूण नफा 57.70 रुपये इतका झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 39.80 कोटी रुपये इतका होता.

3 / 6
कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 13.3 टक्क्यांनी घसरला. हा महसूल 1167 कोटी रुपये इतका होता. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात या कंपनीचा महसूल 1346.40 कोटी रुपये इतका होता. या कंपनीचा EBITDA मार्च महिन्याच्या तिमाहीत 106.40 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर त्यात 9 टक्क्यांची वाढ झाली.

4 / 6
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, या कंपनीला काही दिवसांपूर्वी 4000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय कंपनीचा व्यावसायिक विस्तार झाला आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअरसाठी टार्गेट प्राईस वाढवून 158 रुपये प्रति शेअर इतकी ठेवली आहे.

5 / 6
Texmaco Rail and Engineering कंपनीने तिमाही निकालासोबतच लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनी एका शेअरवर 0.75 रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे. याविषयी घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे एका शेअरवर गुंतवणूकदारांना 75 टक्क्यांचा फायदा होणार आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us