भाच्याच्या लग्नात राकेश रोशन यांचा राग अनावर; किन्नरांशी घातला वाद

हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते किन्नरांशी वाद घालताना दिसत आहेत. ईशान रोशनच्या लग्नसोहळ्यात किन्नर पैसे मागण्यासाठी आले होते.

| Updated on: Dec 24, 2025 | 10:00 AM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीतील रोशन कुटुंबात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. कारण अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशनने नुकतंच ऐश्वर्या सिंहशी लग्न केलंय. 23 डिसेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे विविध व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5
एका व्हिडीओमध्ये हृतिक रोशनला पगडी बांधून वरातीत नाचताना पाहिलं गेलंय. आता हृतिकचे वडील राकेश रोशन त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमध्ये ते किन्नरसोबत वाद घालताना दिसत आहेत.

3 / 5
व्हिडीओमध्ये राकेश रोशन यांना किन्नरांनी घेरलेलं पहायला मिळतंय. सर्वांनी नवरदेव ईशानलाही घेरलंय आणि त्याला जाऊच देत नाहीयेत. किन्नर राकेश रोशन आणि ईशानकडे पैसे मागत होते, परंतु ठराविक रकमेवर त्यांचं एकमत होतच नव्हतं.

4 / 5
या व्हिडीओमध्ये पुढे राकेश रोशन एका किन्नरला संयम राखण्याचा इशारा करतात, परंतु ती नाराज होते. अशातच ते ईशानला तिथून जायला सांगतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

5 / 5
ईशान रोशनच्या लग्नानंतर राकेश रोशन यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर 23 डिसेंबर रोजी रिसेप्शन पार पडलं. रिसेप्शनमध्ये ईशान आणि ऐश्वर्या यांचा शाही अंदाज पहायला मिळाला. तर हृतिक रोशनच्या लूकनेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं.