रणबीरच्या ‘रामायण’मधील लक्ष्मण रवी दुबे पत्नी सरगुनसोबत पार्टीत, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमाने हवा केली आहे. या सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रवी दुबे याने काही फोटो शेअर केले आहेत. पार्टीतील या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. रवी दुबे आणि सरगुन मेहताचे हे खास क्षण चर्चेत आले आहेत.

| Updated on: Nov 29, 2026 | 11:19 PM
1 / 6
रणबीर कपूरच्या रामायणमधील दुसरा एक स्टार सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो म्हणजे रवी दुबे. रवी दुबेने या सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. त्याच्या अत्यंत तल्लख अभिनयाने रवीने लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये जीव ओतला. त्याने साकारलेला लक्ष्मण सर्वांना भावला. आता रवी सिनेमाच्या यशानंतर मस्त एन्जॉय करताना आढळून आले आहेत.

2 / 6

नुकताच रवी त्याची पत्नी आणि अभिनेत्री सरगुन मेहता हे दोघेही एका पार्टीमध्ये स्पॉट झाले. दोघेही अत्यंत सुंदर दिसत होते. ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये सरगुन प्रचंड बोल्ड दिसून आली. तर रवीने वेल्वेट कुर्ता पायजमा परिधान केलेला.

3 / 6

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हे कपल खूपच स्टनिंग दिसत आहे. या फोटोंना चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. दोघांच्याही इन्स्टाग्राम खात्यांवर हे रोमान्सवाले फोटो पाहायला मिळत आहे.

4 / 6

एका फोटोत सरगुन ही रवीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तर रवी सरगुनला खांद्यावर प्रेमाने किस करताना दिसत आहे. त्यांची ही केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

5 / 6

पत्नी सरगुनवर किती प्रेम करावं असं रवीला झालेलं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.दोघांनी 2013मध्ये विवाह केला आहे. दोघांना सध्या मूलबाळ नाही. दोघांनीही टीव्हीपासून करिअरला सुरुवात केली.

6 / 6

रवी ओटीटी, मोठे सिनेमे यांमध्ये उत्तम काम करत आहे. तर सरगुन ही पंजाबी सिनेमांमध्ये मोठी स्टार आहे. दोघांनी केलेली प्रगती आणि त्यासोबत जपलेलं प्रेम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us