
गुरु ग्रह वर्षभरासाठी मिथुन राशीत विराजमान झाला आहे. पण या राशीत विराजमान असताना गुरु ग्रह 12 जूनला अस्ताला गेला होता. आता 27 दिवसानंतर गुरु ग्रहाला तेज प्राप्त होणार आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम होणार आहे.

गुरु ग्रह 9 जुलैला बुधवारी सकाळी 4 वाजून 44 मिनिटांनी उदीत होईल. 12 वर्षानंतर सुख समृद्धीचा कारक असलेला देवगुरु बृहस्पती उदीत होईल.

गुरु ग्रहाच्या उदयानंतर वृषभ राशीच्या जातकांना लाभ होईल कारण या राशीच्या करिअर स्थानात उदीत होणार आहे. वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील.

तूळ राशीच्या जातकांनाही गुरु ग्रहाच्या उदयाचा लाभ मिळणार आहे. कारण या जातकांना प्रगतीत सकारात्मक बदल दिसेल. तुमच्या कामाची लोकांकडून प्रशंसा होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल.

मकर राशीच्या जातकांनाही गुरु ग्रहाची स्थिती लाभदायी ठरेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. समाजात मानसन्मान वाढेल. आत्मविश्वासात वाढ होईल.

मीन राशीच्या जातकांनाही गुरु ग्रहाचं उदीत होणं लाभदायी ठरणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नव्या कामाची सुरुवात करू शकता. मेहनतीचं योग्य फळ या काळात मिळेल.