
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

रोज आपल्या पदरात यश पडेल असं नाही. काही ठिकाणी नमतं घेणंही गरजेचं आहे. प्रयत्न करत राहा. आपल्यामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना याची काळजी घ्या. शुब अंक 6 आणि शुभ रंग निळा राहील.

भविष्याची चिंता करताना सध्याचा वर्तमान खराब करू नका. जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आनंद लुटा. आज आपल्यासोबत असलेल्या व्यक्ती उद्या असतीलच असं नाही. शुभ अंक 3 आणि शुभ रंग लाल राहील.

राग हा खऱ्या अर्थाने माणसाचा शत्रू आहे. एखाद्यावर राग व्यक्त करून गोष्टी ठिक होत नसतात. त्यामुळे शांतपणे काम करत राहा. सर्वकाही ठिक होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग जांभळा राहिल.

कामाच्या ठिकाणी योग्य व्यक्तींसोबत चर्चा करा. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. तसेच वरिष्ठांना चुकीची माहिती पुरवल्याने अडचणीत वाढ होऊ शकते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणाचं नुकसान करू नका. कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग लाल राहील.

तब्येतीची काळजी घ्या. काही त्रास वाटत असल्यास आराम करा. त्रागा करून कामाला जाऊ नका. त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पांढरा राहील.

आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट सोपी होते. याची प्रचिती आज तुम्हाला येईल. इतके दिवस किचकट काम पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग लाल राहील.

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब झाल्याने चिंता वाढेल. कामात मन लागणार नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग नारंगी राहील.

आजचा दिवस चांगला राहील. काही कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. प्रवासात कुटुंब सोबत असल्याने आनंदी राहाल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)