
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

लग्नानंतर जबाबदारी पार पाडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडा. मुलांना काय हवं काय नको याची काळजी घ्या. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

वडिलधाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान करणं गरजेचं आहे. त्यांनी कितीही टोचून बोललं तरी त्यांची काळजी घ्या. त्यांना औषधांचा खर्च योग्यवेळी द्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

जे काही काम कराल त्यातून समाधान मिळणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मनापासून काम करा. निश्चितच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

प्रत्येक दिवस सारखा नसतो हे लक्षात ठेवा. काही अडचणी आल्या तर त्याला सामोरं जा. उगाचच त्रागा करून कुटुंबावर राग काढू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

मानवी स्वभाव त्याच्या वेळेनुसार बदलत असतो. तुमची गरज संपली की आपोआप विसर पडतो. त्यामुळे कोणासोबत किती राहायचं याचा विचार करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

कुटुंबासोबत बाहेर फिरण्याच योग जुळून येईल. त्यामुळे सर्व कामं बाजूला ठेवून त्यांच्यासोबत आनंद लुटा. तुमचं वागणं पाहून मुलंही फ्रेश होतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

काही गोष्टींची आज तुम्हाला जाणीव होईल. तुमची फसवणूक झाली असली तर जवळच्या व्यक्तींना दुखवणं परवडणारं नाही. त्यामुळे थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

भविष्यात काही गोष्टी महागात पडू शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. भावनिक होत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

व्यवसायाच्या दृष्टीने काही क्षण अनुभवणं गरजेचं आहे. कारण चढ उतार आयुष्यात पाहायला मिळतील. पण जीवाभावाची माणसं जपा आणि त्यांची काळजी घ्या. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)