
कर्क राशीचे लोक खूप लाजाळू असतात. ते आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत. पण इतरांना मदत करण्यापासून मागे हटू नाहीत.

वृश्चिक ही राशी देखील कर्क राशीशी मिळती जुळती आहे. या राशीचे लोक इतरांसमोर बोलण्यात खूप घाबरतात. कारण त्यांचा स्वभाव खूप लाजाळू असतो. ते त्यांच्या मनातील गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करत नाहीत. सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच ते समोरच्यावर विश्वास ठेवतात.

मकर राशीचे लोक खूप संयमी असतात. त्यांचा स्वभाव अतिशय लाजाळू असतात. ते लोकांसमोर बोलायला घाबरतात असे नाही. पण त्यांना सहसा काही लोकांसमोर बोलण्याची इच्छा नसते.

मीन राशीचे लोक देखील स्वभावाने खूप लाजाळू असतात. त्यांना नवीन लोकांबद्दल खूप भिती वाटते. ते मन मोकळं करण्यासाठी बराच वेळ लावतात. या राशीचे लोक खात्री पटल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवत नाहीत. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)