‘छावा’मुळे चर्चेत असलेल्या रश्मिकाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, 5 महागड्या गाड्या, जाणून घ्या नेटवर्थ

अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'छावा' सिनेमामुळे चर्चेत आहे. 'छावा' सिनेमात अभिनेत्री छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. 'छावा' मुळे रश्मिकाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून अभिनेत्रीने सिनेमासाठी जवळपास 4 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या संपत्तीची देखील चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 21, 2025 | 3:45 PM
1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. तिच्याकडे अनेक शहरांमध्ये आलिशान मालमत्ताही आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. तिच्याकडे अनेक शहरांमध्ये आलिशान मालमत्ताही आहेत.

2 / 5

रशमिका मंदाना हिचा बंगळुरूमध्ये 8 कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. त्यात बाग आणि डिझायनर फर्निचर आहे. अभिनेत्री कायम स्वतःच्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5

याशिवाय कुर्ग, गोवा आणि हैदराबादमध्येही आलिशान घरे आहेत. एवढंच नाही तर 2021 मध्ये तिने मुंबईत एक अपार्टमेंटही खरेदी केलं आहे.

4 / 5

रश्मिका मंदाना हिच्याकडे सुमारे 40 लाख रुपयांची ऑडी Q3, 50 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ सी-क्लास आणि टोयोटा इनोव्हा आणि ह्युंदाई क्रेटा आहे. अभिनेत्री रॉयल आयुष्य जगते.

5 / 5

रश्मिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us