Ratan Tata यांचं घर कुणी घेतलं भाड्यावर? किती आहे किराया?
Ratan Tata Mansion: मुंबईतील कुलाबा परिसरात आलिशान बंगला The Cabins (Halekai) आता भाड्यावर देण्यात आलं आहे. या आलिशान घराचं भाडं किती आहे? कुणी घेतलं हा बंगला भाड्याने?

Ratan Tata Mansion: मुंबईतील कुलाबा परिसरात आलिशान बंगला The Cabins (Halekai) भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. हे घर जवळपास 13,200 चौरस फुटावर आहे. यामध्ये बेसमेंट, ग्राऊंड फ्लोअर आणि तीन मजले आहेत. टाटा समूहाचे माजी संचालक रतन टाटा यांचे हे निवासस्थान आ

या बंगल्यात आधुनिक इंटिरिअर आणि अनेक आलिशान सोयी-सुविधा आहेत. जैपकीच्या (Zapkey) वृत्तानुसार, या बंगल्याचे मासिक भाडे 17.60 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी भाडे करार करण्यात आला. त्याविषयीच्या कागदपत्रांवर स्वाक्षर्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

हा भाडेकरार आता जरी अस्तित्वात आला असला तरी तो 10 ऑक्टोबर 2024 रोजीपासून लागू होणार आहे. किरायात 1 एप्रिल 2027 पासून 10 टक्क्यांची वाढ होणार आहे. तर भाडे करारानुसार, 10 कोटी रुपयांचे व्याज मुक्त ठेव ठेवण्यात आली आहे. यासाठी मुद्रांक शुल्क 4.63 लाख रुपये देण्यात आले आहे.

या बंगल्याची एकूण किंमत 150 कोटी रुपयांहून अधिक होऊ शकते. पूर्वी या संपत्तीला बख्तावर या नावाने ओळखले जात होते. पण गेल्या कित्येक वर्षांपासून हा बंगला टाटा कुटुंबियांकडे आहे. 2004 मध्ये महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) ने हे घर धोकेदायक आणि राहण्यास योग्य नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर 2008 मध्ये या बंगल्याचे पूनर्निर्माण योजना मंजूर झाली आणि हे घर तयार झाले.

रतन टाटा यांना हे घर ते समूहाचे संचालक आणि टाटा कुटुंबियांचे एक महत्त्वपूर्ण सदस्य असल्याने देण्यात आले होते. त्यानंतर पूनर्निर्माण करताना हे घर प्रसिद्ध वास्तूविशारद रतन बाटलीबोई यांच्याकडून करून घेतले होते. तेव्हापासून या घराला चारचांद लागले होते.

रतन टाटा यांना हे घर ते समूहाचे संचालक आणि टाटा कुटुंबियांचे एक महत्त्वपूर्ण सदस्य असल्याने देण्यात आले होते. त्यानंतर पूनर्निर्माण करताना हे घर प्रसिद्ध वास्तूविशारद रतन बाटलीबोई यांच्याकडून करून घेतले होते. तेव्हापासून या घराला चारचांद लागले होते.

काही वृत्तानुासर, टाटा ट्रस्ट्सचे सध्याचे चेअरमन नोएल टाटा या घरात राहू शकतात. ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. ते सध्या मुंबईतील Cuffe Parade परिसरातील Windmere येथे राहतात. या भाडेकरारानंतर ते या घरात राहायला येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.