Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण

Nepal Flood : तिबेटच्या सीमेवरील गावं या पुरात वाहून गेली आहेत. अचानक आलेल्या या पुरामुळे चीनच्या तिबेटमधून कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या जवळपास 400 यात्रेकरुंशी संपर्क तुटला आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 5:43 PM
1 / 10
नेपाळमधून थरकाप उडवणाऱ्या पुराची दृश्य समोर येत आहेत. भयानक, भीषण या शब्दांपलीकडे जाऊन या पुराचं वर्णन करावं लागेल. भोटेकोशी नदीमध्ये आलेल्या या पुरामुळे हाहाकाराची स्थिती निर्माण झाली आहे.

2 / 10
या पुराने निसर्गाचं रौद्ररुप दाखवलं आहे. फक्त घर, संसारचं नाही तर सर्वकाही उद्धवस्त करणारा हा पूर आहे. शेकडो लोकांचा या पुरामध्ये मृत्यू झाल्याचा भिती आहे. नेपाळला गेलेले 100 पेक्षा जास्त भारतीय पर्यटक बेपत्ता आहेत.

3 / 10
त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. भारताची सीमा नेपाळला लागून आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार या दोन राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर नेपाळमध्ये आलेल्या या पूरामुळे रसुवा क्षेत्रात मोठं नुकसान झालं आहे.

4 / 10
या भीषण नैसर्गिक आपत्तीत बरचं काही उद्ध्वस्त झालं आहे. तिबेटच्या सीमेवरील गावं या पुरात वाहून गेली आहेत. अचानक आलेल्या या पुरामुळे चीनच्या तिबेटमधून कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या जवळपास 400 यात्रेकरुंशी संपर्क तुटला आहे.

5 / 10
यात 105 भारतीय आहेत. त्यांची काही बातमी मिळत नाहीय. हायड्रोलॉजिकल एक्सपोर्ट आणि जियोलॉजिकल संशोधकांनी 'ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड' मुळे हा पूर आल्याचं म्हटलं आहे. पुराचं पाणी इतक्या वेगात आलं की, लोकांना स्वत:ला वाचवण्याची संधीच मिळाली नाही.

6 / 10
हिमस्खलनामुळे तिबेटच्या केरुंग भागात लेंडे नदीचा मार्ग रोखला गेला. त्यामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नदीत अचानक पूर आला. काठमांडू विश्वविद्यालयाचे प्रोफेसर आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संशोधक रिजन भक्त कायस्थ यांनी पुरासाठी हे प्रारंभिक कारण सांगितलं आहे.

7 / 10
नेपाळी आणि चिनी वैज्ञानिकांसोबत झालेल्या चर्चेच्या आधारावर त्यांचा हा निष्कर्ष आहे. हिमस्खलनामुळे लेंडे नदीचा प्रवाह थांबला. त्यामुळे लेंडे नदीत एक कुत्रिम तलाव तयार झाला.

8 / 10
तिथे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेलं. हा हिमनदी जेव्हा फुटली, तेव्हा भोटेकोशी आणि त्रिशुला नदीत पूर आला. काठमांडू पोस्टने हे वृत्त दिलं आहे.

9 / 10
तिबेटच्या उंचावरील भागातून नेपाळमध्ये हे पुराचं पाणी घुसलं. हे पाणी भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला येऊन मिळालं. पाण्याने पुराचं रुप धारण केलं. तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणता बर्फवृष्टी आणि भूकंपामुळे तलाव तयार झालेले.

10 / 10
 मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन दबाव तयार झाला. हा तलाव फुटल्यामुळे सगळं पाणी वेगाने खाली आलं. म्हणून कुठला पाऊस, वादळ नसताना हा पूर आलं.

Follow Us