AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट

6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट

| Updated on: Aug 26, 2026 | 5:51 PM
Share

नेपाळमध्ये तिबेटमधून आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्याने महाप्रलय सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिबेटमधील भूकंप किंवा ग्लेशियर लेक फुटल्याने हा पूर आला असावा. यात १००० हून अधिक लोक बेपत्ता झाले असून, त्यात १०० पेक्षा जास्त भारतीयांचा समावेश आहे. पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्प वाहून गेल्याने मोठी हानी झाली आहे.

पाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तिबेटमध्ये सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी झालेल्या भूकंपाच्या तीव्रतेमुळे हिमस्खलन झाले आणि त्यानंतर नेपाळमध्ये पुराचा प्रचंड लोट आला. काही तज्ञांच्या मते, तिबेटमधील ग्लेशियर लेक फुटल्यामुळे हा प्रलय आला असावा. या महापुरात एक हजाराहून अधिक लोक बेपत्ता झाले असून, यात १०० पेक्षा जास्त भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. नदीकिनारी असलेली घरे, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेले आहेत. काही सेंकंदांच्या हादऱ्यांमुळे इतकं मोठं संकट ओढावलं

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, पुराचे पाणी त्रिशुली नदीत मिसळून धुवाकोट, धादिंग आणि इतर जिल्ह्यांमध्येही पसरले आहे. पाण्याचा लोट इतका प्रचंड आणि वेगवान होता की, लोकांना पळायलाही वेळ मिळाला नाही. हेलिपॅड पाण्याखाली गेल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत आणि वीजपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. बिहारलाही या पुराचा धोका असल्यामुळे बिहार सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. नेपाळ सध्या या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे.

Published on: Aug 26, 2026 05:51 PM

Follow Us