AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 26, 2026 | 5:16 PM
Share

मुंबईत आंदोलनांसाठी आता कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. आझाद मैदानावरच आंदोलनाची परवानगी असून, तीही केवळ एका दिवसासाठी, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंतच. इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईमध्ये आंदोलनांसाठी आता कठोर नियम लागू करण्यात आले असून, यामुळे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांसारख्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असली तरी, ती केवळ एका दिवसासाठी, सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच असेल.

सायंकाळी सहा वाजल्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. हे नियम मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा देणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांच्या नियोजित आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले आहेत. आंदोलनासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी यांसारखी वाहने किंवा प्राणी आणण्यास बंदी आहे. तसेच, मोर्चे आणि बेमुदत ठिय्या आंदोलनांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Published on: Aug 26, 2026 05:16 PM

Follow Us