AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood: त्याची अखेरची धाव व्यर्थ… हॉटेलमधून बाहेर पडताच पूराच्या तडाख्यात, तो Video पाहून सर्रकन अंगावर काटा

Nepal Flood Video: नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापूराने रेसुवा जिल्ह्यात विध्वंस केला. होत्याचे नव्हते केले. या नैसर्गिक संकटाने अनेकांचे जीव घेतले. तर अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. या विध्वंसाचे व्हिडिओ आता समोर येत आहे, त्यामुळे अंगावर काटा येईल.

Nepal Flood: त्याची अखेरची धाव व्यर्थ... हॉटेलमधून बाहेर पडताच पूराच्या तडाख्यात, तो Video पाहून सर्रकन अंगावर काटा
नेपाळ महापूरImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 26, 2026 | 7:12 PM
Share

नेपाळमध्ये आलेल्या महापूराने रेसुवा जिल्ह्यात विध्वंस केला आहे. या नैसर्गिक संकटात अनेकांचा जीव गेल्याचे आणि कित्येक जण बेपत्ता झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नेपाळच्या पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, अद्याप 291 परदेशी पर्यटकांचा कोणताही ठावठिकाणा समोर आलेला नाही. सकाळी भोटेकाशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 384 पर्यटक गायब झाले आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार, गायब झालेल्यांपैकी 291 हे परदेशी नागरिक आहेत. विविध टुरिझ्म एजन्सीनुसार काही आकडेवारी समोर आली आहे, त्यानुसार, एका ठिकाण 59 आणि दुसर्‍या ठिकाणी एकूण 46 भारतीयांची संख्या समोर आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

त्याची अखेरची धावाधाव

अचानक आलेल्या महापूराने होत्याचे नव्हते केले. त्याच्या भयावह व्हिडिओने काळजाचा थरकाप उडतो. या व्हिडिओनुसार, अनेक मोठ्या मोठ्या इमारती एका झटक्यात नेस्तनाबूत झाल्या. अवग्या काही सेकंदात सगळ्या वास्तू, इमारती, शाळा, गावं नामशेष झाल्या. काहीच हाती लागले नाही. एका व्हायरल व्हिडिओत अनेक पर्यटक महापूराचा अलर्ट मिळताच हॉटेलबाहेर पळताना दिसतात. अनेक जण बाहेर पळण्याचा प्रयत्नात होते. पण हॉटेल मागून आलेल्या महापूराने त्यांना कोणतीच संधी दिली नाही. महापूराने सर्वकाही उद्धवस्त केले.

तज्ज्ञांचे मत काय?

हवामान तज्ज्ञ शश्वता सान्याल यांनी नेपाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानुसार नेपाळ-चीन सीमावर्ती भागातील एक बर्फाच्छादित तलाव अचानक फुटल्याने हा महापूर आला. हा बर्फ आणि कचऱ्यामुळे ल्हेन्डे खोला नदीतील प्रवाह काही काळ बंद झाला. पण त्यामागे पाणी साठले. पाण्याचा दबाव वाढल्यावर महापूर आला. पाणी अचानक वेगाने धडकले. या महापूराने संधीच दिली नाही. ल्हेन्डे खोला ही भोटेकाशी नदीची उपनदी आहे.

भूकंपामुळे महापूर?

नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी एक दुसरा दावा केला आहे. त्यानुसार, उत्तरी नेपाळला नेस्तनाबूत करणारा हा महापूर भूकंपामुळे आला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे भोटेकाशी खोऱ्यात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला. त्यांच्या अंदाजानुसार, या परिसरात आज सकाळी 8:37 वाजता भूकंप आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आणि अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला. काही ठिकाणी पाणी अडले या सर्व घटनांमुळे महापूर आला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ