
हिवाळा म्हटले की, मार्केटमध्ये ताज्या भाज्या आणि फळे येतात. विशेष म्हणजे पेरू आणि गाजरची मजाच वेगळी असते. मस्त ताजी ताजी गाजर मार्केटमध्ये येतात.

एकदम फ्रेश गाजर हिवाळ्यात आपल्याला खायला मिळतात. बरेच लोक विविध पदार्थ देखील या गाजरापासून तयार करतात. विशेष म्हणजे ही गाजर आपल्याल आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

नुकताच एका संशोशनानुसार, दर आठवड्याला 2 ते 4 कच्चे गाजर खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका सुमारे 17 टक्क्यांनी कमी होतो.

गाजरमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि ल्युटीन सारखे संयुगे देखील असतात. यामुळे काहीही झाले तरीही दररोजच्या आहारात नाही तर किमान आठवड्यातून दोनदा तरी गाजराचे सेवन केले पाहिजे.

गाजरापासून तयार झालेल्या मिठाई किंवा इतर कोणते पदार्थ खाण्यापेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे आपण कच्ची गाजर खाण्यावर भर दिला पाहिजे, ते अधिक फायदेशीर ठरते.