बजेट 60 लाख अन् कमाई कोट्यवधी रुपये, 69 वर्षांपूर्वीच्या त्या सिनेमाचा रेकॉर्ड आजही कोणी मोडलेला नाही
आज आम्ही ज्या चित्रपटाविषयी बोलत आहोत त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली होती. तेव्हा नर्गिस दत्त यांचे प्राण वाचवण्यासाठी सुनील दत्त यांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली होती. या घटनेनंतर सुनील आणि नर्गिस यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

एकेकाळी बॉलिवूडमध्ये असे चित्रपट तयार करण्यात यायचे की जे कित्येक वर्षे थिएटरमध्ये चालत असत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. जो चित्रपट 60 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताचा चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आता हा चित्रपट कोणता आहे? जाणून घ्या....

हा चित्रपट 1957 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव 'मदर इंडिया' आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. या चित्रपटाचा रेकॉर्ड आजही कोणता चित्रपट मोडू शकलेला नाही. हा चित्रपट 'कल्ट' आणि 'ब्लॉकबस्टर' ठरला होता. 'मदर इंडिया' हा चित्रपट 69 वर्षांपूर्वी आला होता. हा चित्रपट नर्गिस यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटात एका आईची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात नर्गिस दत्त मुख्य भूमिकेत होत्या. त्यांच्यासोबत राजकुमार, राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त हेदेखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलांची भूमिका साकारली होती. तर, राजकुमार यांनी नर्गिस यांच्या पतीची भूमिका साकारली होती.

एका गरीब कुटुंबावर कर्जाचा डोंगर आणि सावकाराचा (लालाचा) अन्याय कसा वाढत जातो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या कठीण काळात कुटुंब आपला उदरनिर्वाह काय करते, हे यात पाहायला मिळते. एक आई आपल्या मुलांसाठी कशाप्रकारे जिवाची बाजी लावते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटात गरिबी आणि शोषण यांचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मेहबूब खान यांनी केले होते. 'मदर इंडिया' हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. वर्ष 1657 मध्ये हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्या वर्षी या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. 'मदर इंडिया' हा चित्रपट जवळपास 60 लाखांच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ४.५ कोटींचा व्यवसाय केला होता. 'मदर इंडिया' हा त्या वर्षातील सर्वात सुपरहिट चित्रपट होता.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली होती. तेव्हा नर्गिस दत्त यांचे प्राण वाचवण्यासाठी सुनील दत्त यांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली होती. या घटनेनंतर सुनील आणि नर्गिस यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.