Anant Ambani : बाबा काशी विश्वनाथ आणि अन्नपूर्णा मातेच्या दर्शनानंतर अनंत अंबानींकडून दोन्ही देवस्थानी भरभरुन कोट्यवधी रुपयांचं दान
Anant Ambani : हिंदू धर्मा प्रती अंबानी कुटुंबाची भक्ती, आस्था नेहमीच दिसून आली आहे. कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य देशातील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी जात असतो. अंबानी कुटुंब नवरात्रौत्सवासारखं पावन पर्व मोठ्या धूमधडाक्यात आणि श्रद्धेने साजरं करतं.

वाराणसीत धूमधडाक्यात देव दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या एक दिवस आधी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलं. त्यांनी अन्नपूर्णा मंदिरात दर्शन आणि विधिवत पूजन केलं.
अनंत अंबानी सोमवारी संध्याकाळी आपल्या विशेष विमानाने वाराणसीत दाखल झाले. त्यानंतर ते श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. गर्भगृहात बाबांचं दर्शन घेतलं. जलभिषेक आणि पूजन केलं. मंदिरात जवळपास पाच मिनिटं त्यांनी पूजा-अर्चना केली.
मंदिर प्रशासनाकडून त्यांना रुद्राक्षची माळ आणि अंगवस्त्र भेट म्हणून देण्यात आलं. त्यांनी मंदिर न्यासाला 5 कोटी रुपयांचं दान दिलं. त्यानंतर अनंत तिथून आई अन्नपूर्णाच्या मंदिरात पोहोचले. तिथे 21 ब्राह्मणांच्या वैदिक मंत्रोच्चारात त्यांनी आईचं षोडशोपचार पूजन आणि कुमकुमार्चन केलं.
या प्रसंगी अनंत अंबानी यांनी बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात 5 कोटी रुपये आणि अन्नपूर्णा मातेच्या चरणी 1 कोटी रुपयांचं दान अर्पण केलं. अनंत अंबानी यांनी दोन्ही मंदिरात विधिवत पूजा-अर्चना केली. कुटुंबाच्या सुख समृद्धिसाठी प्रार्थना केली. अनंत अंबानी यांच्या या धार्मिक यात्रेदरम्यान मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
त्यावेळी त्यांनी आई अन्नपूर्णा यांच्या चरणी 1 कोटी रुपये अर्पण केले. मंदिराच्या अन्नक्षेत्राला सहकार्य करण्याचा विश्वास दिला. अनंत अंबानी याआधी सुद्धा 16 जून 2026 रोजी काशीला गेले होते. त्यांनी बाबा विश्वनाथ आणि आई अन्नपूर्णा यांचं दर्शन घेतलं होतं. अनंत अंबानी खूप धार्मिक आहेत. गणेशोत्सवात आणि नवरात्रौत्सवात हे अनेकदा दिसून आलय.