मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नक्की केव्हा बदलावे? वास्तुशास्त्र काय सांगते?

घराच्या मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नक्की कधी बदलावे? वास्तुशास्त्रानुसार सुकलेले किंवा जुने तोरण घरात कोणती नकारात्मकता आणू शकते आणि तोरण लावण्याचे योग्य नियम काय आहेत, याची माहिती जाणून घ्या.

| Updated on: Apr 09, 2026 | 2:43 PM
1 / 8
भारतीय संस्कृतीत सण-समारंभ किंवा दैनंदिन आयुष्यातही घराच्या मुख्य दरवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराचा मुख्य दरवाजा हे केवळ प्रवेशद्वार नसून तो सकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्त्रोत मानला जातो. याच कारणाने लोक आपल्या दारावर अशोक किंवा आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. मात्र हे तोरण लावताना आणि तसेच ते बदलताना काही वास्तु नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

2 / 8
वास्तुशास्त्रानुसार, घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असला तरी मुख्य दरवाजा हा सर्वात प्रभावशाली भाग असतो. या ठिकाणहून घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दरवाजा सुशोभित आणि स्वच्छ ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तोरण हे शुभशकुनाचे प्रतीक मानले जाते, जे वाईट शक्तींना घराबाहेर रोखण्याचे काम करते.

3 / 8
आजकाल अनेकजण प्लास्टिकची तोरणे वापरतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार ताज्या फुलांच्या आणि पानांच्या तोरणाला सर्वाधिक पसंती दिली जाते. जर तुम्ही खऱ्या पाना-फुलांचे तोरण लावत असाल तर मग काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे असते.

4 / 8
ताजी फुले किंवा पाने साधारणपणे ३ ते ५ दिवसांत किंवा जास्तीत जास्त एक आठवड्यात सुकतात. शास्त्रानुसार, पाने सुकल्यानंतर ती लगेच बदलणे आवश्यक आहे. सुकलेली पाने नकारात्मकता दर्शवतात, त्यामुळे ती दारावर टांगून ठेवणे टाळावे.

5 / 8
जर तुम्ही कापड, मणी किंवा प्लास्टिकपासून बनवलेले तोरण वापरत असाल, तर त्यासाठी वेगळे नियम असतात. कृत्रिम तोरणांवर धूळ लवकर साचते. धूळ लागलेले तोरण वास्तुदोष निर्माण करू शकते. त्यामुळे दर दोन आठवड्यांनी हे तोरण काढून स्वच्छ धुवावे किंवा पुसून घ्यावे.

6 / 8
जर तोरणाचे मणी निखळले असतील किंवा धागे तुटले असतील, तर असे तोरण त्वरित बदलावे. तुटलेल्या वस्तू घरात गरिबी आणि तणाव ओढवून आणतात. तोरण लावण्यासोबतच मुख्य दरवाजाचा परिसर नेहमी स्वच्छ असावा. दारासमोर चपलांचा ढिगारा किंवा कचरा नसावा.

7 / 8
सुंदर तोरणाने सजवलेला दरवाजा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. त्यामुळे, जर तुमच्याही घराच्या दारावरचे तोरण सुकले असेल किंवा जुने झाले असेल, तर आजच ते बदलून घरामध्ये नवीन चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करा.

8 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us