
रॉयल एनफिल्ड तिच्या धकधक आवाजाने सर्वांनाच वेड लावले आहे. आता या कंपनीने तिची बहुप्रतिक्षित Flying Flea C6 ही बाईक लाँच केली आहे. ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक आहे.

कंपनीच्या Royal Enfield Flying Flea C6 चे डिझाइन पण शानदार आहे. या इंजिनमध्ये खास डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. बाईक लाँच करतानाच ती पेट्रोल बाईकच्या सेगमेंटमध्ये विक्री करण्यात येणार नाही हे स्पष्ट करण्यात आले होते.

या बाईकची फ्रेम फोर्ज्ड ॲल्युमिनियमपासून तयार करण्यात आले आहे. तर बॅटरी केस ही मॅग्नेशियम अलॉय पासून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे बॅटरी थंडी आणि वजनाने हलकी असेल.


बाईकची रेंज किती असेल हे अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. एका अंदाजानुसार, ही बाईक एका दमात 200 किमीचा टप्पा सहज गाठेल. पण अजून याविषयीचा कोणताही खुलासा करण्यात आला नाही

Royal Enfield च्या Flying Flea C6 मध्ये ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. त्यामुळे बाईक ब्रेकिंग आणि कंट्रोलसाठी त्याचा फायदा होईल.