

रोहनच्या वाढदिवसानिमित्त सुष्मितानं एक खास पोस्ट केली आहे. तिनं या पोस्टमध्ये रोहमनचं फार कौतुक केलं आहे.

'Happyyyyyy Birthday My Babushhhh @rohmanshawl ??????? ‘Rooh se Rooh tak’' असं कॅप्शन देत तिनं रोहमनसाठी भरपूर काही लिहिलं आहे.

सुष्मिता सेन : कारकिर्दीच्या शिखरावर सुष्मिता सेननं जीवनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 2000 साली तिनं मुलगी रेनीला आणि त्यानंतर 2010 मध्ये मुलगी अलिशाला दत्तक घेतलं. सुष्मिताचं दोन्ही मुलींसोबत बॉन्डिंग उत्तम आहे. ती अनेकदा आपल्या दोन मुलांसोबत फोटो शेअर करत असते. सुष्मिताचा बॉयफ्रेन्ड रोहमन शालही रेनी आणि अलिशाच्या खूप जवळ आहे.

सुष्मिता आणि रोहमननं अजून लग्न केलं नसलं तरी हे दोघं मेड फॉर इच अदर आहेत असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं.