
मागील काही वर्षांपासून युक्रेन आणि रशियामुळे युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, दोन्ही देश काही गोष्टींवर राजी होत नाहीत. त्यामध्ये आता युक्रेनच्या सरकारी इमारतींवर मोठा हल्ला चढवण्यात आलाय. अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीने रशियावर दबाव टाकत आहे.

युक्रेनने रशियाच्या परमाणू ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर आता रशियाने थेट सरकारी इमारतींना टार्गेट करत मोठा हल्ला केला. रशियाच्या जोरदार हवाई हल्ल्याने युक्रेनची राजधानी कीव हादरली. रात्रभर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला सुरू होता. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने मोठे टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावले आहे.

या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला तर 18 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या सरकारी मुख्यालयाला आग लागली. काहीवेळाच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश मिळाले.

युक्रेनच्या हवाई दलाच्या रिपोर्टनुसार, रशियाने एकाच रात्रीत 805 ड्रोन आणि १३ क्षेपणास्त्रे कीवमध्ये टाकली. हा आतापर्यंतचा मोठा हल्ला असल्याचेही सांगितले जातंय. या हल्ल्यातून रशियाने अमेरिकेला उत्तर दिल्याचे सांगितले जातंय.

या हल्ल्यानंतर काही भागात आगीच्या घटना देखील घडल्या. या हल्ल्यात जखमींमध्ये महिलांची संख्या असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजून रशियाची या हल्ल्याबाबतची भूमिका पुढे आली नाहीये. रशियाला या युद्धात दुसऱ्या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नकोय.