Saaniya Chandhok Photos : सचिन तेंडुलकरची सून सानिया गोव्याच्या निसर्गात रमली, फोटोंमध्ये काय खास?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुनेने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती गोव्यात असलेली दिसत असून तिच्या फोटोंना प्रचंड लाईक्स मिळत आहेत.

| Updated on: Oct 10, 2026 | 6:57 PM
1 / 7
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याची पत्नी सानिया चंडोक सध्या तिच्या सुंदर लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याची पत्नी सानिया चंडोक सध्या तिच्या सुंदर लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

2 / 7

सानिया सध्या गोव्यात पर्यटनाचा आनंद घेत आहे. या ट्रिपदरम्यान तिने निसर्गरम्य ठिकाणांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 7

सानियाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत पडलेले शंख-शिंपले आणि पांढरा स्टारफिश पाहायला मिळतो. या फोटोमधून समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्य टिपण्यात आले आहे.

4 / 7

गोव्याच्या सफरीतील दुसऱ्या फोटोमध्ये आसाई स्मूदी बाऊल दिसत आहे. त्यावर केळ्याच्या चकत्या, डाळिंबाचे दाणे आणि पुदिन्याची पाने सजवलेली आहेत. या फोटोनेही लक्ष वेधून घेतले आहे.

5 / 7

सानियाने तिच्या या फोटो अल्बमला ‘Goa Diaries’ असे कॅप्शन दिले आहे. गोव्यातील निसर्गाचे विविध पैलू टिपणाऱ्या तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. या फोटोंचे श्रेय सानिया चंडोकच्या इन्स्टाग्राम अकाउंटला देण्यात आले आहे.

6 / 7

हा सनसेटचा फोटोही तिने शेअर केला आहे. दरम्यान, सानियाच्या या फोटोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत.

7 / 7

सानिया आणि अर्जुनने अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह ५ मार्च २०२६ रोजी मुंबईत झाला पार पडला होता. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. (सर्व फोटो साभार- सानिया चंडोक, इन्स्टाग्राम)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us