कान्समधल्या प्राजक्ता माळीच्या लूकवर सई ताम्हणकर स्पष्टच बोलली; काय परिधान करावं अन् काय नाही हे..
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या कान्स लुकची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता प्राजक्ता माळीच्या या लुकवर सई ताम्हणकरने एक मोठं विधान केलं आहे.

यंदाचा Cannes Film Festival मराठी रसिकांसाठी विशेष ठरला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत सर्वांचं लक्ष वेधलं.

विशेषतः प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. अनेकांनी तिच्या पारंपरिक अंदाजाचं कौतुक केलं तर काहींनी तिच्या पेहरावावर टीकाही केली.

दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्राजक्ताच्या लूकचं उघडपणे समर्थन करत तिचं कौतुक केलं आहे. मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली की, प्राजक्ताने ज्या आत्मविश्वासाने आणि ग्रेसने कान्सच्या रेड कार्पेटवर स्वतःला सादर केलं, ते मला खूप आवडलं असं ती म्हणाली.

पुढे बोलताना तिने काही जणांना ते झोंबलं जरी असलं तरी ते एका अर्थी चांगलंच झालं. कारण तिथे बऱ्याच जणांचं लक्ष तिच्याकडे होतं. मला वाटतं कोणी काय परिधान करावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोक बोलणारच आहेत. त्यामुळे आपण का उगाच तक्रारी करायच्या? त्यापेक्षा तो क्षण साजरा करा ना असं ती म्हणाली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सई ताम्हणकर लवकरच 'तुंबाडची मंजुळा' या मराठी चित्रपटात दिसणार असून, यापूर्वी ती मटका किंग या सीरिजमध्ये झळकली होती.