
बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक लव्ह-स्टोरी आहेत, ज्या कधी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्यांची चर्चा आजही होते. अशीच एक लव्ह-स्टोरी अभिनेत्री अमृता सिंग आणि क्रिकेटर रवी शास्त्री यांची होती. हे दोघं एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

अमृता आणि रवी शास्त्री हे एकमेकांशी लग्नसुद्धा करणार होते. मात्र रवी शास्त्री यांच्या एका अटीमुळे दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. या दोघांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा विचार केला.

रवी शास्त्री यांनी अमृता सिंगसमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही, अशी ही अट होती. अमृताला ही अट मंजूर नव्हती. या अटीबाबत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. मात्र त्यातून काही उपाय निघाला नाही. अखेर अमृताने तिच्या करिअरला प्राधान्य देत ब्रेकअप केलं.

त्यावेळी अमृता सिंग करिअरच्या शिखरावर होती. अभिनय करणं हे तिला सर्वाधिक पसंत होतं. म्हणूनच अमृताने रवी शास्त्री यांच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले.

अमृताने तिच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. त्याचसोबत 12 वर्षांनी लहान सैफ अली खानसोबत लग्नामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती. मात्र लग्नाच्या 13 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत.