
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं होतं. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या चित्रपटाचं कौतुक झालं होतं. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी त्यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर यामध्ये आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली होती.

'सैराट' या चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. पाटलाच्या भूमिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. सुरेश विश्वकर्मा हे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नुकतंच त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नीने काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

विद्या असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा.. माझ्या हृदयाचा राजा', असं कॅप्शन देत विद्या यांनी हा खास फोटो पोस्ट केला आहे.

विद्या यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुरेश यांच्यासोबत बरेच फोटो आणि व्हिडीओ पहायला मिळतात. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून सौंदर्याच्या तुलनेत चांगल्या अभिनेत्रींनाही टक्कर देणाऱ्या आहेत.

सुरेश विश्वकर्मा यांनी 'सैराट'शिवाय 'राजा राणी', 'अल्याड पल्याड', 'रेगे', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 'धर्मवीर 2'मध्ये ते आमदार संजय शिरसाट यांच्या भूमिकेत झळकले होते.