
अहान पांडे आणि अनित पड्डा स्टारर 'सैय्यारा' या चित्रपटाची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाची कमाईही दणक्यात होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सैय्यारा' ने अवघ्या 12 दिवसांत जगभरात 409 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले असून तरूणाी तर चित्रपटामुळे क्रेझी झाली आहे.

या चित्रपटाची कथा कथा अहान-अनित यांच्या फ्रेश जोडीला लोकांची खूप पसंती मिळत आहेच. त्याव्यतिरिक्त, चित्रपटात दाखवलेली शूटिंग लोकेशन्स देखील लोकांना खूपच आवडली आहेत.

हा चित्रपट पडद्यावर उत्तमरित्या सादर करण्यासाठी निर्मात्यांनी मुंबई, गोवा आणि मनाली येथील विविध ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग केल्याची माहिती समोर आली आहे.

तर मुंबईत सेंट झेवियर्स कॉलेज, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि वांद्रे किल्ल्यावर देखील 'सैय्यारा' चित्रपटाचे शूटिंग झालं आहे.

तर मनालीमध्ये, या चित्रपटांचं शूटिंग हे नग्गर किल्ल्यावर झाले आहे. हा किल्ला बर्फाळ टेकड्यांनी वेढलेला आहे. याशिवाय धुंडी पुलाजवळील दृश्ये देखील चित्रपटात दिसली आहेत.

गोव्यातील अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चजवळही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर 'सैय्यारा' चित्रपटाचे चित्रीकरण अलिबागमध्येही करण्यात आले आहे जेणेकरून समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दृश्य पाहता येईल.