Salman Khan: ‘बिग बॉस 20’मध्ये सलमानला ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपची आठवण; असं काय बोलून गेला ‘भाईजान’?

Salman Khan: बिग बॉस 20 च्या प्रीमिअर एपिसोडमध्ये ईशा रिखीशी बोलताना सलमान खानने ब्रेकअप आणि भूतकाळाचा उल्लेख केला. त्याच्या याच वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी ऐश्वर्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.

| Updated on: Sep 08, 2026 | 11:13 AM
1 / 6
‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमिअर सध्या चर्चेत आहे. या पर्वाच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये रॅपर बादशाहची पूर्व पत्नी ईशा रिखीने तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या जुन्या नात्याबद्दल बोलताना ईशाच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून होस्ट सलमान खानने तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि ब्रेकअपनंतर आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला.

‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमिअर सध्या चर्चेत आहे. या पर्वाच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये रॅपर बादशाहची पूर्व पत्नी ईशा रिखीने तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या जुन्या नात्याबद्दल बोलताना ईशाच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून होस्ट सलमान खानने तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि ब्रेकअपनंतर आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला.

2 / 6

ईशा रिखी तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना रडू लागली. त्यावेळी सलमान खानने तिला म्हटलं, “सगळ्यांचे ब्रेकअप होतात. तू कोणासमोर उभी आहेस, हे तुला माहीत आहे ना?” सलमानच्या या वक्तव्यानंतर ईशाने आपला भूतकाळ आता मागे सोडल्याचं स्पष्ट केलं. “तो माझा भूतकाळ आहे,” असं तिने सांगितलं.

3 / 6

यानंतर सलमानने ईशाला वैयक्तिक आयुष्याबाबत एक महत्त्वाचा सल्ला दिला. तो म्हणाला की, भूतकाळ हा भूतकाळच राहू द्यायला हवा आणि त्याबद्दल कोणाचंही नाव घेण्याची गरज नाही. आपल्या वैयक्तिक समस्या या वैयक्तिकच राहिल्या पाहिजेत, असंही सलमानने म्हटलं.

4 / 6

“काय झालं, कशाला झालं, यात कोणाची चूक आहे... हे जाणून घेण्याची कोणालाही गरज नाही. ती वेळ संपली. मूव्ह ऑन,” अशा शब्दांत सलमानने ईशाला समजावलं. समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली असेल, तर आपणही भूतकाळात अडकून न राहता पुढे जाणं गरजेचं आहे, असा त्याच्या बोलण्याचा सूर होता.

5 / 6

ईशा रिखीला दिलेला सलमानचा हा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याची तुलना अभिनेत्याच्या स्वतःच्या भूतकाळाशी करण्यास सुरुवात केली. विशेषतः सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या जुन्या नात्याचा संदर्भ देत अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

6 / 6

सलमानच्या “वैयक्तिक समस्या वैयक्तिकच राहिल्या पाहिजेत”, “ती वेळ संपली” आणि “मूव्ह ऑन” या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी ऐश्वर्या रायचं नाव घेत प्रतिक्रिया दिल्या. काहींनी सलमानने स्वतःच्या अनुभवातून हा सल्ला दिला का, असा प्रश्नही उपस्थित केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us