
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानने चित्रपट, जाहिराती आणि इतर माध्यमांतून बरीच संपत्ती कमावली आहे. मुंबईपासून दुबईपर्यंत विविध ठिकाणी सलमानची प्रॉपर्टी आहे. सलमानचं घर मुंबईतील वांद्रे पश्चिम इथल्या बायरामजी जीजीभॉय रोडवर आहे. 'गॅलेक्सी अपार्टमेंट' असं त्याचं नाव आहे.

या घरात सलमान ग्राऊंड फ्लोअरवर वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतो. तर त्याचे आई-वडील पहिल्या मजल्यावर राहतात. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, या अपार्टमेंटची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे. ईद आणि वाढदिवसानिमित्त सलमानची एक झलक पाहण्यासाठी असंख्य चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर जमतात.

पनवेलमध्ये सलमानचं 150 एकरांवर पसरलेलं फार्महाऊस आहे. अर्पिता फार्म्स असं त्याचं नाव आहे. या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूल, जिम, घोडेस्वारीची जागा आणि पाहुण्यांसाठी काही बंगले.. अशा सर्व सोयीसुविधा आहेत. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार या फार्महाऊसची किंमत जवळपास 80 कोटी रुपये आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंटशिवाय सलमानकडे मुंबईत वांद्रे परिसरातच आणखी एक आलिशान ट्रिपलएक्स फ्लॅट आहे. या 4BHK प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग पूल, एक पार्टी हॉल आणि लिविंग स्पेस आहे. इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, याची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे.

सलमानने त्याच्या 51 व्या वाढदिवशी मुंबईतील गोराईमध्ये एक आलिशान 5BHK बीच हाऊस खरेदी केला होता. यामध्ये जिम, मोठा स्विमिंग पूल, प्रायव्हेट थिएटर आणि बाइक एरिना अशा सर्व सुविधा आहेत. या बीच हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्यात सलमान अनेकदा प्रायव्हेट पार्ट्यांचं आयोजन करतो.

सलमान खानच्या इंटरनॅशनल रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये दुबईतील बुर्ज खलिफाजवळ द एड्रेस डाऊनटाऊनमध्ये एक आलिशान अपार्टमेंट आहे.