AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोकं चक्रावून टाकणारा थ्रिलर चित्रपट; अनेक आठवडे विसरू शकणार नाही क्लायमॅक्स

तुम्हाला जर मिस्ट्री थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपटांची आवड असेल तर हा चित्रपट आवर्जून पहा. हा चित्रपट म्हणजे फक्त एक कथा नाही, तर रहस्यांचं असं जाळं आहे, जो शेवटपर्यंत तुम्हाला गुंतवून ठेवतो. याचा क्लायमॅक्स तुम्हाला थक्क करून सोडेल.

| Updated on: Apr 26, 2026 | 10:19 AM
Share
मल्याळम चित्रपट नेहमीच त्यांच्या प्रभावी कथानकांसाठी आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या क्लायमॅक्ससाठी ओळखले जातात. 'संभवम अध्यायम ओन्नू' हा अशाच धाटणीचा एक चित्रपट आहे. कथानकाच्या प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य उलगडतो आणि जर तुम्हाला बुद्धीला चालना देणाऱ्या कथा आवडत असतील, तर हा चित्रपट 'मस्ट वॉच' यादीत आवर्जून समाविष्ट करा.

1 / 7
'संभवम अध्यायम ओन्नू' या चित्रपटाच्या कथेत अशी वळणं आणि ट्विस्ट येतात, की तुम्ही शेवटपर्यंत त्यात गुंतून राहता. अंगावर काटा आणणारा याचा क्लायमॅक्स तुम्हाला हादरवून सोडेल. हा एक असा थ्रिलर चित्रपट आहे, जो तुम्ही अनेक आठवडे विसरू शकणार नाही.

2 / 7
या चित्रपटाची सुरुवातच दमदार कथानकाने होते, जे तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. ही कथा एका रहस्यमयी जंगलाची आहे, जिथून काही लोक अचानक गायब होतात. 'संभवम अध्यायम ओन्नू'च्या कथेच रहस्यांचं मोठं जाळंच आहे. त्या घनदाट जंगलात काय दडलंय, याबद्दल सतत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होते.

3 / 7
ही कथा एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते, ज्याची बदली नवीन ठिकाणी झालेली असते. तो त्याच्या गरोदर पत्नीला सोडून कामावर रुजू होण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जातो. पुढे असं कळतं की त्या रहस्यमयी जंगलात एक पोलीस अडकलेला आहे आणि त्याला वाचवण्यासाठी तीन पोलीस त्या जंगलात जातात.

4 / 7
जो कोणी त्या जंगलात जातो, तो कधीही परत येत नाही, असं म्हटलं जातं. त्यात शिरल्यावर दोन पोलिसांचा मृत्यू होतो आणि एक पोलीस अधिकारी दुष्टचक्रात अडकतो. हाच चित्रपटाच्या कथेत मोठा ट्विस्ट आणणारा क्षण असतो. या चित्रपटाची संकल्पना इतकी उत्कृष्ट आहे, की तुम्हाला कुठेच तो कंटाळवाणा वाटत नाही.

5 / 7
विशेष म्हणजे एका तासानंतर कथानकात पूर्णपणे वेगळं वळण येतं, ज्यामुळे उत्कंठा शंभर पटींनी वाढते. मल्याळम चित्रपटसृष्टीत जंगल आणि निसर्गाविषयीच्या कथा मांडण्याची प्रचंड क्षमता आहे, हे हा चित्रपट दाखवून देतो. यात कालप्रवास आणि कालचक्र यांसारख्या गोष्टींचा शोध घेतला जातो, जे विषय आजपर्यंत फारच कमी हाताळले गेले आहेत.

6 / 7
'संभवम अध्यायम ओन्नू' हा चित्रपट तुम्ही जियो हॉटस्टार या ओटीटीवर हिंदी भाषेत पाहू शकता. याला आयएमडीबीवर 7.3 रेटिंग मिळाली आहेत. यामध्ये नीतू कृष्णा, सिद्धार्थ भरथन आणि अस्कर अली यांच्या भूमिका आहेत. जीतू मंगलाथू यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

7 / 7
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी