चांदगुडे कुटुंब संपलं, घाटी रुग्णालयाबाहेर मोठा वाद….वेगवेगळ्या अंत्यसंस्कारामागचं धक्कादायक कारण समोर..

चांदगुडे कुटुंबाच्या संभाजीनगरातील (Sambhajinagar) खवड्या डोंगरावरील शेवटाने सर्व सोशल मीडिया भरुन वाहात आहे. अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहून हळहळ व्यक्त होत आहे.त्यात आता मुलगा कुणाल आणि त्याच्या आईचे अंत्यसंस्कार त्याच्या आजोळी तर वडीलांचे अंत्यसंस्कार त्यांच्या गावीच झाल्याचे उघड झाले आहे, मात्र, या मागचे कारण आता समोर आले आहे.

| Updated on: Aug 23, 2026 | 11:53 PM
1 / 5
या प्रकरणात आता दोन्ही संगिता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी होण्याचे कारण उघडकीस आले आहे. मुरलीधर चांदगुडे आणि संगिता यांच्या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणात आता दोन्ही संगिता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी होण्याचे कारण उघडकीस आले आहे. मुरलीधर चांदगुडे आणि संगिता यांच्या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असल्याचे उघडकीस आले आहे.

2 / 5

मुलगा कुणाल आणि वडील घरी रहात नसल्याने नाराज होता असे म्हटले जात असतानाच आता मुरलीधर चांदगुडे यांना त्यांची पत्नी संगिता हीनेच बाहेर काढल्याचा आरोप मुरलीधर यांची बहिण शोभा म्हस्के यांनी केला आहे.

3 / 5

आई-वडीलांच्या विरोधात जाऊन त्याने लग्न केल्याने आम्ही त्यांच्याशी संबंध तोडल्याचे मुरलीधर यांची बहिण शोभा म्हस्के यांनी आरोप केला आहे.

4 / 5

भावाचा आणि भाच्याचा कड्यावरुन मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर आम्ही संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात पोहचलो होतो.आम्ही तिघांचे अंत्यसंस्कार करतो असे म्हटले होते.

5 / 5

मात्र , वहिनी ( संगिता ) हीच्या आईने आपल्याला शिवीगाळ केल्याचे बहिण शोभा म्हस्के यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही भावाचे अंत्यसंस्कार आमच्या गावी केल्याचे म्हस्के यांनी सांगितले. तर वहिनी संगिता आणि भाचा कुणाल यांच्यावर आजोळी अंत्यसंस्कार केल्याचे संगिता यांची भावजयीने सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us