
आपण आजपर्यंत मंत्री आणि आमदारांचे बॉडीगार्ड पाहिले होते. पण बैलाचे बॉडीगार्ड कधी पाहिले का? सांगलीत एका पठ्ठ्याने बैलाचे बॉडीगार्ड घेऊन देवीचा नवस फेडला आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खिलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हते.

यामुळे अंकुश यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व भक्तांची आराध्य देवी कर्नाटक येथील चिंचणी गावच्या माय्याक्का देवीला साकडे घातले होते.

माझं चांगले कर मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईन आणि देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालीन. त्यानंतर अंकुश यांना त्याच्या जीवनात आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अंकुश यांनी चिंचणी माय्याक्का देवीला बैलगाडी घेऊन गेले.

यानंतर अंकुश याने सोन्या आणि छब्या या बैलजोडीला घेऊन मायाक्का देवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे अंकुश यांनी तब्बल 6 बॉडीगार्ड घेऊन मायक्का देवीचे दर्शनाला गेले.

त्यांनी देवीच्या मंदिराला 6 बॉडीगार्डच्या मदतीने प्रदक्षिणा घातली. अंकुश यांनी आटपाडी करगणी ते मायक्का चिंचणी असा 125 किमी अंतर चालत जाऊन दर्शन घेतले. यामुळे मंदिर परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मायक्का चिंचणी या गावात बॉडीगार्ड सोबत बैलगाडी गर्दीत गेल्यावर बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली. प्रत्येक जण सेल्फी काढू लागले आणि बैलाचे बॉडीगार्ड पाहून लोक अचंबित होऊ लागले.

पण या लाखोंच्या गर्दीत 6 बॉडीगार्ड लोकांनी बैलांना वाट काढून देत देवीच्या प्रदर्शना घातल्या आणि देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आपले नवस फेडले.