गाणं पाहिजे तर असं, ज्या शिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, आजही ऐकू येताच थिरकतात लोक

1989 मधील प्रचंड सुपरहिट गाणं, जे प्रत्येक पार्टीमध्ये वाजत. आजही या गाण्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी. पाकिस्तानी गायकाने गायलं होतं गाणं.

| Updated on: Jun 28, 2026 | 4:18 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. 1989 साली प्रदर्शित झालेल्या एका गाण्याने त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाण्याची धून सुरू होताच लोकांचे पाय आपोआप थिरकू लागायचे.

2 / 5
लग्नसमारंभ, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कोणतीही पार्टी असो, 'हवा हवा ऐ हवा' हे गाणे हमखास वाजायचे आणि उपस्थित मंडळी त्यावर मनमुराद नाचायची. या गाण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते एखाद्या भारतीय गायकाने नाही तर पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक हसन जहांगीर यांनी गायले होते.

3 / 5
आपल्या दमदार आणि वेगळ्या आवाजामुळे लोकप्रिय ठरलेल्या हसन जहांगीर यांना पाकिस्तान सरकारकडून 'सितारा-ए-इम्तियाज' हा प्रतिष्ठेचा सन्मानही मिळाला आहे. हे गाणे 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इन्साफ अपने लहू से' या चित्रपटातील आहे.

4 / 5
या चित्रपटात संजय दत्त, शत्रुघ्न सिन्हा आणि सोनम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील या गाण्याने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली आणि अल्पावधीतच ते सुपरहिट ठरले.

5 / 5
या गाण्याचे बोल समीर, हसन कमाल आणि देव कोहली यांनी लिहिले होते. शब्दांमधील सहजता आणि आकर्षक धून यामुळे हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर चढले. तर या गाण्याला संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. त्यांच्या संगीत दिग्दर्शनामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली.

Follow Us