माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी संजीव कुमार माझ्या घरी आले होते; महागुरुंनी सांगितला किस्सा

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकताच एक किस्सा सांगितला आहे. संजीव कुमार यांचा एक किस्सा त्यांनी सांगितला आहे.

| Updated on: Jul 20, 2025 | 5:37 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाने वेगळ्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. हे किस्से सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच सचिन पिळगावकर यांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी 1963 साली प्रदर्शित झालेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

2 / 5
एका रेडिओ मुलाखतीदरम्यान सचिन पिळगावकर यांनी हा किस्सा सांगितला. 1963 साली प्रदर्शित झालेला ‘हा माझा मार्ग एकला’ हा चित्रपट राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने त्या काळी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली होती. चित्रपटात शरद तळवलकर, सीमा देव, राजा परांजपे, राजा पटवर्धन आणि जीवनकला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या, तर रीमा लागू यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. यावेळी सचिन पिळगावकर अवघे सात वर्षांचे होते.

3 / 5
सचिन यांनी मुलाखतीत सांगितले की, प्रख्यात अभिनेते संजीव कुमार यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ हा चित्रपट पाहिला आणि त्यांना सचिन यांची भूमिका इतकी आवडली की, ते स्वतः सचिन यांच्या घरी आले. यापूर्वी त्यांनी सांताक्रुझ येथील एका स्टेशनरी दुकानातून ऑटोग्राफ बुक खरेदी केली.

4 / 5
घरी येऊन संजीव कुमार म्हणाले, “मी आजपर्यंत कोणाचाही ऑटोग्राफ घेतलेला नाही. पण तुझा चित्रपट पाहून मी इतका प्रभावित झालो की, तू मला तुझा ऑटोग्राफ द्यावा.” असे म्हणत त्यांनी सचिन यांच्यापुढे ऑटोग्राफ बुक ठेवले. वयाच्या सातव्या वर्षी सचिन यांच्या अभिनयाने थोर अभिनेते संजीव कुमार यांना इतके प्रभावित केले की, त्यांनी स्वतःहून सचिन यांचा ऑटोग्राफ घेतला, असा दावा सचिन यांनी केला.

5 / 5
सचिन पिळगावकर यांच्या या दाव्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांच्या मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले, “अशोक सराफ, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, सिप्पी यांच्या निधनानंतर महागुरूंकडून आणखी काही खुलासे होतील.” तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “दर वेळी गीतेवर हात ठेवून खरे सांगण्याची शपथ घेऊनच महागुरूंना मुलाखतीला बसवावे.”