
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ७ नोव्हेंबर रोजी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता त्यांच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने देखील कमेंट केली आहे.

विकी आणि कतरिना यांनी सोशल मीडियावर “आमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण... खूप आनंद आणि उत्साहाने आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतो – कतरिना आणि विकी.. ” असे लिहिले होते.

विकी आणि कतरिनाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने देखील कमेंट करत विकी कौशलल शुभेच्छा दिल्या आहेत.

संतोष जुवेकरने ओय होय छोटा छावा आलाय... खूप खूप शुभेच्छा कौशल कुटुंबाला अशी कमेंट करत हार्ट इमोजी वापरले आहेत.

विकी आणि कतरिना या जोडप्याने ही गुड न्यूज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव झाला. साधारण दीड महिन्यापूर्वी विकी-कतरिनाने एक खास फोटो पोस्ट करत प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर चॅप्टर आता सुरू होत आहे असं म्हणत, त्यांनी ही अनाऊन्समेंट केली होती.