जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत लग्नबंधनात अडकणार? त्या ‘काऊटडाऊन’मुळे सोशल मीडियावर चर्चा

गायिका जुईली जोगळेकर आणि गायक रोहित राऊत लग्न करणार असल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
- रोहित आणि जुईली मागच्या 3-4 दिवसांपासून काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दररोज दोघांचा एकत्र एक फोटो ते शेअर करत आहेत. आणि त्यासोबत ‘काऊटडाऊन’ देत आहेत. त्यामुळे हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा होतेय.
- झी मराठीवरच्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. याच कार्यक्रमात जुईलीदेखील होती. तिथे या दोघांची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री बहरत गेली.
- पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्याची कबुली त्यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांची जोडी अनेकांना आवडते. हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
- आता जुईली आणि रोहित शेअर करत असलेल्या फोटोंवरून त्यांचं लग्न २३ जानेवारीला होईल असा अंदाज लावण्यात येतोय.




