
मुंबई याठिकाणी असलेले पर्यटन स्थळं, मंदीर, मार्केट... अनेक गोष्टी पर्यटकांमध्ये चर्चेत असतात... पण मुंबईत असं एक ठिकाण आहे जे, मुंबईतील सर्वांत मोठं 'फिश मार्केट' म्हणून ओळखलं जातं... जेथे माशांची बोली देखील लागते... ते म्हणजे ससून डॉक...

सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे... ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात..

या मार्केटमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक मासे मिळतील. ससून डॉक हे मुंबईतील सर्वात मोठे घाऊक मासळी बाजार देखील आहे. रोज सकाळी याठिकाणी माशांवर बोली लागते आणि इतर बाजारांमध्ये मासे विक्रीसाठी उपलब्ध असतात...

रिपोर्टनुसार, 1 हजार 500 हून अधिक बोटींद्वारे दररोज 20 टनहून अधिक मासे ससून डॉक याठिकाणी आणले जातात. 144 वर्षे जुने डॉक वारसा आणि खाद्य दोन्हीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.

मुंबईत अनेक फिरण्यासारखी ठिकाणं आहेत... त्यातील एक म्हणजे ससून डॉक... ससून डॉक याठिकाणी अनेक परदेशी पर्यटक येतात आणि मासे खरेदी करतात.