राजस्थानमधील दुसरे अक्षरधाम मंदिर; जोधपूरमध्ये होणार प्राणप्रतिष्ठा

Akshardham temple in Rajasthan : राजस्थानच्या जोधपूर येथे एक भव्य अक्षरधाम मंदिर निर्माण कार्याला गती आली आहे. आता हे मंदिर अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल.

| Updated on: Sep 16, 2025 | 3:22 PM
1 / 6
राजस्थानमध्ये दुसरे अक्षरधाम मंदिर जोधपूर शहरात निर्माण करण्यात येत आहे. वैशाली नगरात यापूर्वी एक अक्षरधाम मंदिर बांधण्यात आले होते. आता शहरातील सौंदर्यात आणि आध्यात्मिक क्षेत्रात चारचांद लावणारे हे मंदिर सुरसागर क्षेत्रात कालीबैरी येथे उभारल्या गेले आहे.

2 / 6
या दुसऱ्या अक्षरधाम मंदिराची  प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल. मंदिराचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा करण्यात येईल

3 / 6
हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी राजस्थान, भारतातूनच नाही तर जगभरातील 4 उपखंडातून मोठ्या संख्येने भाविक येतील. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातील लोक या ठिकाणी येतील.

4 / 6
हे अक्षरधाम मंदिर जोधपूर मध्ये 42 बिघा जागेत हे मंदिर उभारल्या जात आहे. मुख्य मंदिर 10 बिघा जागेत आहे. या मंदिराचा पाया हा जमिनीपासून 13 फूट उंच आहे.  मंदिराच्या भिंतीसाठी जोधपूरी चित्तर दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सुंदर आणि नक्षीदार कोरीवकाम करण्यात आले आहे.

5 / 6
24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यात चित्ररथ सुद्धा असेल. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतील. या परिक्रमेत नवीन मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येतील.

6 / 6
गुरुहरी महंत स्वामी महाराज यांचे जोधपूर शहरात 19 सप्टेंबर रोजी आगमन होत आहे.