
परळी शहर वासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परळी शहर बायपासचे काम सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.

आज मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबुन या कामाची पाहणी केली.

यावेळी काम अत्यंत वेगाने, दर्जात्मक पद्धतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे यांना आपण केलेल्या प्रयत्नांचे फलित पाहून, या रस्त्यावर उभारून सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही!

धनंजय मुंडे गाडीतून खाली उतरले, त्यांनी रस्त्याची नीट पाहणी केली.

रस्ता चांगला होतोय हे लक्षात येतानाच आपला फोन खिशातून काढला आणि थेट सेल्फी घ्यायला सुरूवात केली.

धनजंय मुंडे यांनी काढलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.